महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै ।। चहा आणि कॉफी पिणारे जगभरात असंख्य लोक आहेत, परंतु तुम्हाला माहीत आहे का, की उकळता किंवा अतिशय उष्ण चहा आणि कॉफी पिण्याची सवय हाडांसाठी खूप धोकादायक असू शकते? अशा उष्ण चहा-कॉफीच्या सेवनाचे अन्यही काही धोके तज्ज्ञांनी सांगितलेले आहेत. त्याची ही माहिती…
हाडे कमकुवत होणे
उकळत्या चहा आणि कॉफीमध्ये असलेले कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता कमी होते. यामुळे कॅल्शियमची कमतरता होते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो.
ऑस्टिओपोरोसिसचा धोका
उकळत्या चहा आणि कॉफीमध्ये असलेले टॅनिन नावाचे घटक कॅल्शियमचे शोषण रोखतात. यामुळे ऑस्टियोपोरोसिस नावाच्या आजाराचा धोका वाढतो, ज्यामध्ये हाडे खूप कमकुवत होतात.
दातांचे नुकसान
उकळता चहा आणि कॉफीमध्ये असलेल्या अॅसिडमुळे दातांचे इनॅमल कमकुवत होते, ज्यामुळे दातात कीड लागणे आणि दात पिवळे होऊ शकतात.
पोटात जळजळ
चहा आणि कॉफी उकळता प्यायल्याने पोटात जळजळ, अॅसिडिटी आणि अपचन होऊ शकते.
झोपेचा त्रास होणे
चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते ज्यामुळे झोपेचा त्रास होतो. चहा किंवा कॉफी उकळता प्यायल्याने हा त्रास वाढू शकतो.
रक्तदाब वाढणे
उकळता चहा आणि कॉफीमधील कॅफिनमुळे रक्तदाब वाढू शकतो, जो हृदयरोगांसाठी धोकादायक ठरू