महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै ।। महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन ठप्प झाले आहे. या पावसाने महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झाली. दानवली येथे अंगणवाडीच्या भिंतीचाकाही भाग कोसळला तर दुधोशी येथे जि.प. शाळेची भिंत ढासळली. वेण्णालेकजवळ डोंगरावरील माती व दगड रस्त्यावर आले. दरम्यान, महाबळेश्वरमध्ये 24 तासांत या हंगामातील उच्चांकी म्हणजे तब्बल 240 मिमी पावसाची नोंद झाली.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड व पाटण तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची तुफान बॅटींग सुरू आहे. पावसाचे आगार असलेल्या महाबळेश्वरमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्त्यावर वाघेरा नजीक सोमवारी पहाटे महाकाय दरड कोसळली. त्यामुळे मोठमोठे दगड व माती रस्त्यावर आली. दरड रस्त्यावर आल्याने महाबळेश्वर व तापोळा या दोन्ही बाजूकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तसेच रस्त्यावर सर्वत्र राडारोडा झाला होता. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाला समजल्यानंतर उपअभियंता अजय देशपांडे व कर्मचार्यांनी ज्या ठिकाणी दरड कोसळली तेथे धाव घेतली. पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने ही दरड हटवण्याचे काम दिवसभर सुरू होते. सकाळी 9.30 च्या सुमारास मोठी दरड हटवल्याने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. 15 दिवसांपूर्वीही याच परिसरात दरड कोसळली होती. सोमवारीही दरड पडल्याने वाहतूक बंद झाल्याचे दिसून आले.
Landslide In Mahabaleshwar
नवीन महाबळेश्वर विकास योजनेत घोटाळा
तालुक्यातील दानवली या गावात मुसळधार पावसामुळे लहान मुलांच्या अंगणवाडीच्या इमारतीचा काही भाग कोसळला. तसेच दुधोशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचाही काही भाग कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. सोमवारी महाबळेश्वर शहरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. या पावसातही पर्यटकांची रेलचेल दिसून आली. पर्यटकांनी रेनकोट परिधान करून बाजारपेठेत फेरफटका मारताना दिसत होते. मुसळधार पावसामुळे लिंगमळा परिसरा जलमय झाला असून नागरिकांचे हाल झाले. सोमवारी सकाळी 8.30 पर्यंत तब्बल 241 मिमी पावसाची नोंद झाली. आतापयर्र्ंत महाबळेश्वरमध्ये 2 हजार 560 मिमी (100.80 इंच) पावसाची नोंद झाली आहे.