महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै ।। आज असं एकही घर नाही ज्या घरात पाण्याची टाकी नाही. घरातील विविध वस्तूंसह पाण्याची टाकी फार महत्वाची झाली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या घरात ही टाकी असते. पाण्याच्या टाकीमध्ये आपण ५०० ते १००० लिटरपर्यंत पाणी साठवून ठेवतो. पाणी सतत साठवल्याने काही काळानंतर टाकी खराब होते. पाण्याची टाकी खराब झाल्याने कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो.
पाण्याची टाकी आकाराने फार मोठी असते. त्यामुळे ती रोज सहज स्वच्छ करणे म्हणजे भलं मोठं आव्हानच आहे. टाकीमध्ये पाणी साठून राहिल्याने काही काळानंतर त्यात कीटक, मच्छर तयार होण्याची देखील शक्यता असते. खराब पाणी शरीरात गेल्यावर कुटुंबातील सर्व व्यक्ती आजारी पडतात. त्यामुळे आज आम्ही पाण्याची टाकी सहज कशी साफ करायची याच्या काही सोप्प्या आणि सिंपल ट्रिक्स आणल्या आहेत.
तुरटी वापरा
तुरटी सुद्धा पाणी स्वच्छ करते. तुम्हाला टाकी स्वच्छ करायची असेल तर सर्वात आधी तुरटी घ्या. ही तुरटी एक बालदी पाण्यात काही वेळासाठी टाकून ठेवा. त्यानंतर टाकीतील पाणी आर्धे रिकामे करून घ्या. पाणी कमी केल्यानंतर टाकीमध्ये तुरटीचे पाणी मिक्स करा. त्यामुळे पाण्यातील सर्व गाळ खाली जमा होईल. वरती सर्व स्वच्छ पाणी राहिल. काहीवेळाने टाकीत उरलेलं पाणी सुद्धा काढून घ्या आणि टाकी एका कापडाने पुसून घ्या.
हायड्रोजन पॅरॉक्साइड
हायड्रोजन पॅरॉक्साइड देखील घरातील टाकी साफ करण्यासाठी फायदेशीर आहे. मात्र याचा वापर फार काळजीपूर्वक केला पाहिजे. मोठी टाकी साफ करण्यासाठी ५००ml हायड्रोजन पॅरॉक्साइड पाण्यात मिक्स करावे लागेल. १० ते २० मिनिटे हे असेच ठेवा. त्यानंतर घरातील सर्व नळ खोला आणि पाणी बाहेर वाहून जाऊ द्या. असे केल्याने टाकी पूर्ण स्वच्छ होते.
वॉटर टँक क्लिनर
बाजारात लिक्विडमध्ये एक वॉटर टँक क्लिनर सुद्धा मिळते. तु्म्ही याचा उपयोग सुद्धा टाकी साफ करण्यासाठी करू शकता. वॉटर टँक क्लिनर पावडर आणि लिक्विड दोन्ही स्वरुपात मिळते. हे पाण्यात मिक्स केल्यावर १० मिनिटांनी सर्व नळातून पाणी वाहून जाऊ द्या. यामुळे तुमचे नळ देखील स्वच्छ होतील.