Best Smartphones Deals : जुलै महिन्यातील चार सर्वोत्तम फ्लॅगशिप फोन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै ।। : उच्च दर्जाचे फीचर्स आणि तांत्रिक क्षमतेच्या दृष्टीने सर्वोत्तम स्मार्टफोन शोधणं सोपं नाही. पण काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी जुलै महिन्यातील चार सर्वोत्तम फ्लॅगशिप फोन शॉर्टलिस्ट केले आहेत. यामध्ये Xiaomi 14 Ultra 5G देखील समाविष्ट आहे.

Xiaomi 14 Ultra 5G : या फोनमध्ये जबरदस्त पॉवर आहे. त्याची 12-बिट AMOLED स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटसह येते आणि गेमिंग आणि व्हिडीओ पाहण्याचा अनुभव खूपच सुंदर बनवते. 5000mAh ची मोठी बॅटरी दिवसभर सहज चालते आणि 90W चार्जिंगमुळे फक्त 30 मिनिटांत फोन पूर्ण चार्ज होतो. याशिवाय 80W वायरलेस चार्जिंगचाही पर्याय आहे. Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरमुळे गेमिंग आणि व्हिडीओ एडिटिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी मिळते. 50MP मुख्य कॅमेरा आणि Leica ट्यूनिंगमुळे कोणत्याही प्रकाशात उत्तम फोटो आणि व्हिडीओ काढता येतात. या फोनची किंमत 99,999 रुपये आहे.

Vivo X Fold 3 Pro 5G : हा फोल्डेबल फोन असूनही आकाराने पातळ आहे. यात 5700mAh ची मोठी बॅटरी आहे जी Galaxy S24 Ultra आणि OnePlus 12 पेक्षाही मोठी आहे. 100W वायर आणि 50W वायरलेस चार्जिंगचा पर्याय आहे. Snapdragon 8 Gen 3 चिपसेट आणि Zeiss कॅमेरा सिस्टम या फोनमध्ये आहेत. दोन्ही स्क्रीनवर AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. या फोनची किंमत 1,59,999 रुपये आहे.

iPhone 15 Pro Series : जर तुम्हाला Apple फोन आवडत असेल तर iPhone 15 Pro सिरीजवर नजर ठेवा. यात A17 Pro चिप आहे जी गेमिंग आणि व्हिडीओ एडिटिंगसाठी उत्तम काम करते. कॅमेराही जबरदस्त आहे. फ्लॅट AMOLED डिस्प्ले आहे. iPhone 15 Pro Max मध्ये मोठी स्क्रीन आणि बॅटरी आहे. या फोनमधील सर्वात मोठी खासगी म्हणजे येत्या iOS 18 अपडेटमध्ये Apple Intelligence सपोर्ट मिळणार आहे.

OnePlus 12 5G : या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह सुंदर कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे. 5400mAh ची बॅटरी आणि 100W वायर आणि 50W वायरलेस चार्जिंग आहे. Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आणि Hasselblad कॅमेरा सिस्टम आहे. या फोनची किंमत 64,999 रुपयांपासून सुरु होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *