Budget 2024 : बजेट मजबूत कमी मजबूर जास्त! गरीब, मध्यम वर्गाला दिलासा; गुंतवणूकदार नाराज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै ।। Budget Announcement 2024 in Marathi: सालाबादप्रमाणे यंदाही सर्वसामान्यांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या असून या बजेटमधून सर्वसमान्यांना काय मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. करसवलत, रेल्वे, मूलभूत सुविधा, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी योजना यापैकी नेमकं काय आणि किती प्रमाणात मिळणार याबद्दल उत्सुकता आहे. याच बजेटसंदर्भातील अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

नव्या कररचनेमुळे सरकारला 37000 कोटींचा फटका बसणार असून त्याचवेळी 30 हजार कोटी मिळणार आहेत. त्यामुळे सरका रला बसणारा एकूण फटका 7000 कोटींचा आहे असं अर्थमंत्र्यांनी नव्या कररचनेची घोषणा केल्यानंतर स्पष्ट केलं.

निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचं वाचन पूर्ण केल्यानंतर शेअर बाजाराकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स एक हजार अंशांनी घसरला; निफ्टी 240 अंकांनी गडगडला आहे.

नवीन करप्रणालीमध्ये बदल; अर्थमंत्र्यांची घोषणा
नव्या कर प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली असून यामुळे 17500 रुपयांचा फायदा होणार आहे.

0 ते 3 लाख उत्पन्न – 0% कर

3 ते 7 लाख उत्पन्न – 5% कर

7 ते 10 लाख उत्पन्न – 10% कर

10 ते 12 लाख उत्पन्न – 15% कर

12 ते 15 लाख उत्पन्न – 20% कर

15 लाखांहून अधिक उत्पन्न – 30% कर

यामुळे करदात्यांचे 17500 रुपये वाचणार.

काय स्वस्त काय महाग?
इंपोर्टेड ज्वेलरी स्वस्त होणार, इलेक्ट्रीक वाहनं स्वस्त होणार, एक्स रे मशीन स्वस्त होणार तर प्लास्टिकच्या वस्तू महागणार

टीडीएससंदर्भात मोठा दिलासा
विलंबाने टीडीएस भरणे यापुढे गुन्हा नाही. आयकर कायदा 1961 ची पुढील सहा महिन्यात समीक्षा होणार. आयकर परतावा भरणं अधिक सुलभ होणार, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

कॅन्सरच्या 3 औषधांवरील कर रद्द
कॅन्सरवरील 3 औषधांना कस्टम ड्यूटीमधून वगळण्यात आल्याची अर्थमंत्र्यांकडून घोषणा; कररचना अधिक सुलभ करण्यावर भर

मोबाईल फोन्स आणि चार्जर स्वस्त होणार : अर्थमंत्री

शेतीसाठी 1.52 लाख कोटींची घोषणा
शेती आणि कृषीसंदर्भातील श्रेत्रांसाठी केंद्रीय अर्थमंत्री नीर्मला सीतारमण यांनी 1.52 लाख कोटींची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *