महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै ।। राज्यात काल देशाचे अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी काय घोषणा करण्यात येणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्यासाठी घोषणा होईल,अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. परंतु पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
पेट्रोल डिझेलचे दर रोज अपडेट होत असतात. मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. देशात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहे. हे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊया पेट्रोल डिझेलचे भाव
महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव
नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहेत. मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.चेन्नईत पेट्रोलचे दर १००.७८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.३६ रुपये आहे.कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे.
महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर
महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही.पुण्यात पेट्रोल १०४.०८ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९०.६१ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.६४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.१६ रुपये आहे.नाशिकमध्ये पेट्रोल १०४.६८ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.१९ रुपये आहे.नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५२ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०४.४८ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९१.०२ रुपयांवर विकले जात आहे.