महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै ।। त्र्यंबकेश्वर विश्वस्त समितीने भाविकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.त्या निर्णयाचा भाविकांचा नक्कीच फायदा होईल.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. भाविकांना टाईम दर्शन देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.भाविकांना ऑनलाइन दर्शन पास देऊन त्यावर असलेल्या वेळेतच भाविकांना आता दर्शन मिळणार आहे. .येणाऱ्या भाविकांना सुखकर दर्शन व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 200 रुपये भाविकांना ऑनलाइन पाससाठी शुल्क भरावे लागणार आहे. भाविकांसाठी स्वतंत्र मुखदर्शनाची देखील व्यवस्था करण्यात येणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होतं आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.