महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै ।। पॅरिस : ऑलिंपिक स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी होत आहे. शनिवारपासून स्पर्धा-शर्यतींना प्रारंभ होईल आणि पहिल्या दिवसापासून पदकेही मिळतील; परंतु उद्यापासून फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. नुकत्याच संपलेल्या युरो आणि कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील विजेते अनुक्रमे स्पेन आणि अर्जेंटिना आता ऑलिंपिकमध्येही विजेतेपद मिळवणार का, याची उत्सुकता असेल.
२४ जुले ते १० ऑगस्ट या दरम्यान फुटबॉलचे सामने होणार आहेत. फ्रान्सच्या सात ठिकाणी या लढती होतील. पुरुष आणि महिलांचे संघ असणार आहेत. दोन्ही विभागांचे अंतिम सामने पॅरिस देस प्रिंस या स्टेडियमवर होणार आहेत. पुरुषांचा अंतिम सामना ९ तर महिलांची सुवर्णपदकाची लढत १० ऑगस्ट रोजी होणार आहे.
असे असतात संघ
भूतलावरचा सर्वात लोकप्रिय असलेल्या फुटबॉल खेळाच्या संघांसाठी (पुरुष) ऑलिंपिकमध्ये मात्र वेगळे नियम आहेत. २३ वर्षांखालील खेळाडू असणे बंधनकारक आहेत, केवळ तीन खेळाडूंना वयाचे बंधन नसते, त्यामुळे तिघे जण व्यावसायिक खेळाडू असू शकतात. त्यामुळे मेस्सी ते अलेक्स मॉर्गन आणि रोनाल्डिन्होपासून एलेन व्हाईटपर्यंत सर्व दिग्गज खेळलेले आहेत. महिलांमध्ये मात्र वयाचे बंधन नाही.
यांच्यावर असेल लक्ष ज्युलियन अल्वारेझ (अर्जेंटिना) ः कोपा अमेरिका स्पर्धा जिंकलेली असल्यामुळे अर्जेंटिना सुवर्णपदकाचे दावेदार असल्याचे बोलते जात आहे. लिओनेल मेस्सी आणि निवृत्त झालेला डी मारिया नसला तरी अर्जेंटिनाचे इतर खेळाडूही तेवढेच सक्षम आहेत. निकोलस ओटामेंडी आणि जेरोनिमो रुल्ली आणि ज्युलियन अल्वारेझ हे तीन व्यावसायिक खेळाडू आहेत.
अलेक्झांडर लॅकझेट (फ्रान्स) ः फ्रान्सचे माजी खेळाडू आणि आता प्रशिक्षक असलेल्या थिएरी हेन्री यांनी कर्णधारपदाची जबाबदारी अलेक्झांडर लॅकझेट याच्यावर दिली आहे.
कोणी मिळवलीय सर्वाधिक पदके?
ऑलिंपिकच्या फुटबॉलमध्ये सर्वाधिक आठ पदके अमेरिकेने मिळवलेली आहेत. त्यात चार सुवर्णांचा समावेश आहे. त्यानंतर हंगेरीने तीन सुवर्णांसह पाच पदके मिळवलेली आहेत. ग्रेट ब्रिटनने तीन पदके मिळवली आहेत, तिन्ही सुवर्णपदके आहेत.
सलामीला फ्रान्सचा सामना अमेरिकेविरुद्ध
पुरुषांची गटवारी
अ – फ्रान्स, अमेरिका, गयाना, न्यूझीलंड
ब – अर्जेंटिना, मोरोक्को, इकार, युक्रेन
क – उझबेकिस्तान, स्पेन, इजिप्त, डॉमिनिकन रिपब्लिक
ड -जपान, पॅराग्वे, माली, इस्रायल
महिला
अ – फ्रान्स, कोलंबिया, कॅनडा, न्यूझीलंड
ब – अमेरिका, झाम्बिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया
क – स्पेन, जपान, नायजेरिया, ब्राझील