Pune School: पालकांनो पुण्यातील 49 अनधिकृत शाळांपैकी 13 शाळा बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै ।। एकूण 49 शाळा अनधिकृत (Unauthorized School) असल्याचे निदर्शनास आले होते. शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांपैकी 13 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यातील दहा शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अन्य 10 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या अनधिकृत शाळांच्या यादीमध्ये 49 शाळांचा समावेश होता. त्यातील काही शाळा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील, तर काही शाळा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आणि काही शाळा पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आहेत. पुणे जिल्हा परिषदेने अनधिकृत शाळांवर बडगा उगारल्याने शिक्षण क्षेत्रातून मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी केवळ अनधिकृत शाळांची नावं जाहीर केली जात होती. यावेळी प्रत्यक्षात अनधिकृत शाळेवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार शाळांवर कारवाई करण्यात आली आहे.

बंद केलेल्या शाळांची नावे खालील प्रमाणे आहेत-
1. किड्जर्जी स्कुल, शालीमार चौक दौंड

2. जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास कासुर्डी, दौंड

3. यशश्री इंग्लिश मिडीयम स्कुल सोनवडी, दौंड

4. भैरवनाथ इंग्लिश मिडियम स्कुल मोई, खेड

5. संस्कृती इंटरनॅशनल स्कुल, आंबेगांव खुर्द, हवेली

6. श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी

7. रिव्हस्टोन इंग्लिश मिडीयम स्कुल, पेरणे फाटा

8. सोनाई इंग्लिश मिडीयम स्कूल, फुरसुंगी

9. श्रेयान इंटरनॅशनल स्कुल साईनगर गहुंजे, ता. मावळ

10. व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल, नायगांव, ता. मावळ

11. माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कुल, कासारवाडी

12. श्री. चैतन्य इंग्लिश मिडीयम स्कुल विशालनगर, पिंपळे निलख

13. केअर फौंडेशन पुणे संचलित इमॅन्युअल पब्लिक स्कुल, महंमदवाडी रोड, हडपसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *