इंटरनेटशिवायही Whatsapp वापरता येणार; मोठमोठ्या फाइल्स एका झटक्यात सेंड होणार, जाणून घ्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै ।। जगभरात लाखो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपमुळे आपण कोणतीही माहिती सहजपणे मिळवू शकतो. व्हॉट्सअॅपचा वापर करताना इंटरनेट खूप महत्त्वाचे असते. इंटरनेटशिवाय आपण व्हॉट्सअॅपद्वारे कोणताही मेसेज ट्रान्सफर करु शकत नाही. परंतु आता तुम्ही कोणताही फाइल इंटरनेटशिवाय ट्रान्सफर करु शकणार आहेत. यासाठी व्हॉट्सअॅप लवकरच एक फीचर लाँच करणार आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, मेटा कंपनी व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरमध्ये आता तुम्हाला तुमच्या मित्रांना कोणताही चित्रपट किंवा हेवी फाइल पाठवण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. हे फिचर आयफोन एअरड्रॉप फाइल शेअरिंग फिचरप्रमाणे काम करेल.

मिडिया रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप नवीन फाइल शेअरिंग फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर इंटरनेटशिवाय फाइल पाठवण्यासाठी मदत करेन. व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरमुळे तुम्हाला फोटो, व्हिडिओ, फाइल शेअर करणे सोपे होणार आहे. WhatsApp च्या या फीचरमध्ये क्यूआर कोडचा वापर केला जाईल. त्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करुन फाइल ट्रान्सफर करता येणार आहे.

अनेकदा मोठ्या फाइल्स ट्रान्सफर करताना नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे इंटरनेटशिवाय फाइल ट्रान्सफर करणे सोपे होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या या फीचरमध्ये एंड टू एंड एनक्रिप्शन असेल. ज्यामुळे युजर्सच्या गोपनियतेचे पाळन केले जाणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *