महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै ।। राज्यभरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहर व परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. आणि जसा पावसाळा सुरू झाला तसा शहरातील नालेसफाईची दूर अवस्था समोर यायला लागलेली आहे. लालटोपीनगर मोरवाडी येथील झोपडपट्टीत सतत चालू असलेल्या पावसामुळे लोकांच्या झोपडीत पाणी शिरले आहे. पाणी काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.नाला तुडुंब भरून वाहत असल्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे, लालटोपीनगर मधील लोकांना आम्हाला फोन आला आम्ही सारर्थीला फोन केला त्यांनी दोन फोन नंबर दिले त्यांना फोन केला ते माणसे पाठवून देतो म्हणून सांगितले . सामाजिक कार्यकर्ते दिपक ज्ञानदेव भोजने सौ.रेणुकाताई दिपक भोजने यांनी तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली पाण्याचा प्रवाह जोराचा होता पुढे जाण्यास कठीण होत होते स. म्राट चौकात तळ्याचे स्वरूप आले आहे पालिका प्रशासने तत्काल मदत करावी ही नागरिकांची माफक अपेक्षा आहे .