महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै ।। मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान धावणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. बदलापूर आणि वांगणी दरम्यान उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज घेऊन या एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मध्य रेल्वे सांगितले आहे. मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आलेले आहेत, तर उद्या सकाळी पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस पुणे मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द असतील.