RBI Rule: RBI चा मोठा निर्णय ! बँकांना यापुढे आता …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जुलै ।। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकासाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी काही नियम लावण्यात आले आहे. या नवीन नियमांनुसार, आता युजर्संना कोणत्याही बाह्य खात्यांमध्ये पैसे ट्रान्सरफर केल्यावर त्याची नोंद ठेवावी लागणार आहे. म्हणजेच, तुम्ही कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवले तर त्याची नोंद तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. हा नवीन नियम १ नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. आर्थिक व्यव्हारांमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

RBI ने ऑक्टोबर २०११ मध्ये केलेल्या डॉमेस्टिक कॅश ट्रान्सफर फ्रेमवर्कमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, बँकाना आता रोख पेमेंटच्या करणाऱ्या ग्राहकांची आणि ज्या व्यक्तींच्या अकाउंटमध्ये पेमेंट केले आहे त्यांचे रेकॉर्ड ठेवावे लागमार आहे. याशिवाय बँकेला पैसे पाठवणाऱ्या प्रत्येक व्यव्हाराचे प्रमाणीकरण करण्यासाठी ऑथेंटिकेशन करावे लागणार आहे. यामध्ये कार्ड टू कार्ड व्यव्हारांचा समावेश होत नाही.

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI)अभ्यासातून समोर आले आहे की, २०२२-२३ मध्ये इक्विटी कॅश श्रेणीतील ७१ टक्के गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. या काळात व्यवसाय करणाऱ्यांची संख्या ३०० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे.

३० वर्षांखालील गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कॅश ट्रान्झॅक्शन करणाऱ्या ग्राहकांमध्ये पारदर्शकता नसल्याचे दिसून आले आहे. २०२२-२३ मध्ये, या गुंतवणूकदारांचा हिस्सा ४८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यामध्ये मोठे व्यव्हार करणाऱ्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच व्यव्हारांमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *