महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवी दिल्ली – :दि.१० देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. यात झालेलं नसून भरून काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मागील महिनाभर पेट्रोल आणि डिझेल दर वाढवले. गेल्या महिन्याभरात २१ वेळा पेट्रोल आणि २३ वेळा डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८७.१९ रुपयांवर कायम आहे. तर डिझेलचा प्रती लीटर भाव ७९.०५ रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८०.४३ रुपये प्रती लीटर तर डिझेलचा भाव ८०.७८ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये आहे. चेन्नईत डिझेल ७७.९१ रुपये आणि कोलकात्यात ७५.८९ रुपयांपर्यंत स्थिर आहे. जागतिक बाजारात ब्रेन्ट क्रूड ०.०५ टक्के वाढून ४३.३१ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. त्याचवेळी चलन बाजारात भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तीन पैशांनी वधारला आणि एका अमेरिकी डॉलरला ७४.९९ रुपये मोजावे लागले.
लॉकडाउन शिथिल केल्यानंतर सार्वजनिक वाहतुकील परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढली. जूनमध्ये ११.८ दशलक्ष टन पेट्रोलियम उत्पादनांची विक्री झाली आहे. हे प्रमाण आता टाळेबंदी पूर्व स्थितीवर आले आहे. जूनमध्ये पेट्रोलचा खप ८५ टक्के तर डिझेलचा खप ८२ टक्के झाला. जून २०१९ मध्ये १३.४ दशलक्ष टन पेट्रोलियम उत्पादनांची विक्री झाली होती.