लवकरच आयुर्वेदिक औषधांनी कोरोनावर उपचार; ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – :दि.१० कोरोनाव्हायरसवर सध्या विविध औषधांचं ट्रायल सुरू आहे. रेमिडेसिवीर, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन यासह विविध औषधांचा यात समावेश आहे आणि आता लवकरच कोरोनावर उपचारासाठी आयुर्वेदिक औषधही वापरली जाण्याची शक्यता आहे. कोरोनावर उपचारासाठी आयुर्वेदिक औषधांचं ट्रायल केलं जाणार आहे. विशेष म्हणजे भारतासह अमेरिकेतही हे ट्रायल होणार आहे.

भारत आणि अमेरिकेत कोरोनावर उपचारासाठी आयुर्वेदिक औषधांचं ट्रायल केलं जाणार आहे, तशी योजना आखली जात असल्याची माहिती अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजीत सिंह सिंधू यांनी दिली. नामांकित असे भारतीय-अमेरिकी शास्त्रज्ञ, तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या समूहाशी संधू यांनी बुधवारी डिजीटल संवाद साधला.

संधू यांनी सांगितलं, “संयुक्त शोध, शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी आपल्या संस्था एकत्र आल्या आहेत. भारत आणि अमेरिका दोन्ही देशांचे आयुर्वेदिक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसवर उपचार म्हणून आयुर्वेदिक औषधांचं संयुक्त क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याची योजना बनवत आहेत. संस्थागत भागीदारीच्या व्यापक नेटवर्कमुळे कोविड-19 विरोधात लढण्यासाठी दोन्ही देशांचे शास्त्रज्ञ एकवटले आहेत”

“अमेरिकेतील संस्थांसह भारतीय औषध कंपन्यांची कमीत कमी तीन करार होत आहेत. किफायतशीर औषध आणि लस बनवण्यात भारतीय औषध कंपन्या अग्रेसर आहेत आणि या महासाथीविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावतील. यामुळे फक्त भारत आणि अमेरिकेलाच फायदा होणार नाही तर जगभरातील कित्येक लोकांना लाभ होईल, ज्यांना कोविड-19 पासून बचावासाठी लशीची गरज आहे”, असं सिंधू म्हणाले.

दरम्यान भारतातही आयुर्वेदिक औषधांनी उपचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत आयुष मंत्रालयाने गाइडलाइन्सही जारी केल्यात. भारतात अॅलोपॅथीसह आयुर्वेद आणि होमिओपॅथी औषधांबाबतही शोध सुरू आहे. त्यात आता आयुष मंत्रालयाने लक्षण नसलेल्या आणि गंभीर कोरोना रुग्णांना आयुष-64 अगस्तय, हरीतकी आणि अणु तेल देण्याची तयारी सुरू आहे. ही तिन्ही औषधं ताप, खोकला आणि श्वाससंबंधी समस्या असलेल्या रुग्णांना दिली जातील. कोरोना रुग्ण आणि क्वारंटाइन असलेल्या लोकांना ही तिन्ही औषधं देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा परिणाम सकारात्मक आला तर सामान्य नागरिकांनाही हे औषध उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *