ITR Filling: ITR भरताना ‘या’ चुका अजिबात करू नका, अन्यथा भरावा लागू शकतो मोठा दंड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै ।। इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहे. ३१ जुलै ही आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही ३१ जुलैआधी अर्ज केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. आयटीआर फाइल करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी करदात्यांकडून केली जात आहे. मात्र, याबाबत प्राप्तिकर विभागाने कोणतीही मिहीती दिली नाही.आयटीआर फाइल करताना नेहमी खरी माहिती भरावी. जर तुम्ही कर वाचवण्यासाठी चुकीची माहिती भरली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना तुम्ही कर वाचवण्यासाठी चुकीचे क्लेम करु नका. अन्यथा प्राप्तिकर विभाग तुमच्यावर कारवाई करु शकतात. जर तुम्ही तुमचे उत्पन्नदेखील कमी दाखवले तरीही तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही आयटीआर फाइल करताना चुकीची माहिती भरली तर तुमचा रिफंड येण्यासाठी वेळ लागतो.

याबाबत प्राप्तिकर विभागाने माहिती दिली आहे. प्राप्तिकर विभागाने म्हटलंय की, कृपया आयटीआरमध्ये चुकीची माहिती भरु नका. तुमचे उत्त्पन्न कमी करुन सांगू नका.हा एक दंडनीय गुन्हा आहे. जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुम्हाला कर रक्कमेच्या १०० के ३०० टक्के दंड भरावा लागू शकतो.

मुदतीनंतर आयटीआर भरल्यास काय होते
तुम्हाला ३१ जुलै २०२४ पर्यंतच आयटीआर भरणे अनिवार्य आहे. जर तुम्ही आयटीआर भरण्यास उशीर केला तर तुम्हाला १००० ते १०,००० रुपये दंड भरावा लागणार आहे. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे सांगितले तर तुम्हाला ५० टक्के दंड भरावा लागेल. जर तुमच्याकडून चुकून आयटीआर भरताना चुकीची माहिती भरली गेली असेल तर तुम्ही त्यात बदल करु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *