महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै ।। रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यातून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉर्ड लाइन या ठिकाणी नॉन-इंटरलॉकिंगचे काम सुरु असल्याकारणाने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या इतर मार्गाने देखील वळवल्या आहेत. पनवेल-हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, दौंड-निजामाबाद डेमू, पुणे-बारामती-पुणे डेमू, पुणे-दौंड डेमु, सोलापूर-दौंड-सोलापूर डेमू आणि पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या असून इतर गाड्या दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.