![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै ।। 1 ऑगस्टपासून गुगल मॅप एक मोठा बदल करत आहे. कंपनीने पेमेंट सिस्टम बदलली आहे. Google Maps ने आपल्या पेमेंट स्कीमला रिवाइज केलं आहे. यासह कंपनीने पेमेंटची पद्धतही बदलली आहे. गुगल मॅप्सने भारतातील आपला चार्ज 70 टक्के कमी केले आहेत. हा चार्ज डेव्हलपर तसंच इतरांकडून घेतला जातो.
गुगल मॅप्स आता आपल्या सर्व्हिसचा चार्ज भारतीय चलनात घेणार आहे. आधी ही रक्कम डॉलरमध्ये घेतली जात होती. नुकतंच Ola ने आपले स्वत:चे मॅप्स तयार केले असून, गुगलचा वापर बंद केला आहे. यानंतर कंपनीने मोठी रक्कम वाचवली आहे. Ola आधी हेच पैसे गुगल मॅप्स वापरण्यासाठी कंपनीला देत होती. पण आता आपले मॅप तयार करत त्यांनी 100 कोटी वाचवले आहेत. Ola ने गुगल मॅपच्या धर्तीवर स्वत:चा Ola Map तयार केला आहे. आता ते त्याचाच वापर करतात.Google Maps हा चार्ज सर्वसामान्यांना आकारणार नाही. त्यामुळे तुम्ही काहीही चिंता न करता वापरु शकता. हा चार्ज फक्त डेव्हपरकडून घेतला जातो![]()
