SEBI: इनसायडर ट्रेडिंगचे नवे नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार, म्युच्युअल फंड उद्योगात होणार मोठा बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुलै ।। Insider Trading Rules: म्युच्युअल फंडांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी नवीन इनसाइडर ट्रेडिंग नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांच्या (AMC) कामकाजातही सुधारणा होणार आहे. नवीन नियमांनुसार संवेदनशील माहिती ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. याशिवाय अशा कर्मचाऱ्यांना करारनामाही करावा लागणार आहे.

सेबीने अधिक पारदर्शकता आणण्यासाठी इनसाइडर ट्रेडिंग नियमांमध्ये ‘कनेक्टेड पर्सन’ची व्याप्ती वाढवली आहे. त्यात म्हटले आहे की ‘कनेक्टेड पर्सन’ ही अशी व्यक्ती असते ज्याच्याकडे गोपनीय आणि संवेदनशील माहिती असते. सल्लागार कंपन्याही या कक्षेत आणण्यात आल्या आहेत.

नातेवाईकही ‘कनेक्टेड पर्सन’ असतील
नवीन नियमांनुसार, संवेदनशील माहितीचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि इतर व्यक्तींची यादी ठेवावी लागेल. या सर्वांना गोपनीयतेच्या करारावर स्वाक्षरी करावी लागेल. त्याच्या मदतीने, इनसाइडर ट्रेडिंग थांबवण्यासाठी सेबीला मदत होणार आहे.

इनसाइडर ट्रेडिंगच्या नियमांतर्गत नातेवाईकही येणार आहेत. पती/पत्नी, भावंडे, पती/पत्नीच्या भावंडांप्रमाणेच कुटुंबातील सदस्यही यात सहभागी असणार आहेत.

26 जुलै रोजी अधिसूचना जारी करताना, सेबीने म्हटले होते की नवीन इनसाइडर ट्रेडिंग नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. नवीन नियमांनुसार, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना वेळोवेळी त्यांना कामाचे मुल्यांकन करावे लागणार आहे.

नवीन नियमानुसार, एएमसींना म्युच्युअल फंड योजनांमध्ये एएमसी, विश्वस्त आणि त्यांचे नातेवाईक यांच्या स्टॉक एक्स्चेंजमधील त्यांच्या होल्डिंगचा तपशील जाहीर करावा लागेल. याशिवाय नामनिर्देशित व्यक्तीने केलेल्या व्यवहारांची माहितीही दोन दिवसांत द्यावी लागणार आहे.

जुलै 2022 मध्ये, SEBI ने म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये इनसाइडर ट्रेडिंग संदर्भात सल्लापत्र जारी केले होते. परंतु, उद्योगसमूहाच्या विरोधामुळे नवीन नियम लागू करण्यास विलंब होत असल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *