महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जुलै ।। अकोल्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकार याची हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मंगळवारी राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये राडा झाला. अमोल मिटकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणातील 11 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. यामध्ये जय मालोकारचा देखील समावेश आहे. जयच्या नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मंगळवार अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या 11 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये जय मालोकार यांचाही समावेश होता. या हल्ल्यानंतर सर्व मनसे कार्यकर्ते पसार झाले होते. सायंकाळी अचानक जय मालोकार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचा निधन झालं. हा संपूर्ण प्रकार धक्कादायक आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी मालोकार कुटुंबांनी केली आहे.
नातेवाईकांची मागणी
जय मालोकार यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. त्यामध्ये जय मालोकार यांना कोणी धक्काबुक्की केली मारहाण केली याचा सर्व तपास करून न्याय मिळावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. 26 वर्षाचा तरुण असा अचानक निघून गेल्याने कुटुंबियांसाठी हा सर्वात मोठा धक्का बसला आहे. तसेच आतापर्यंत मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी कुटुंबीयाशी संपर्क साधला नसल्याचही जय मालोकार यांच्या मोठ्या भावाने म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे भेटीला
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा नाशिकचा दौरा रद्द करण्यात आला आहे. अकोल्यामध्ये मनसैनिक जय मालोकार याच्या मृत्यूमुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मालोकार कुटुंबियाची भेट घेण्यासाठी अमित ठाकरे अकोल्याला जाण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.