महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जुलै ।। ऑगस्टची सुरुवातच राज्यात अतिवृष्टीने होणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला १ ते ३ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा अरिज अलर्ट देण्यात आला असून, विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे, मात्र, मराठवाडयातील काही भाग वगळता बहुतांश भागांत कमी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जुलै महिन्यात मराठवाडा वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला. तसाच पाऊस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या पावसाला ३१ जुलैपासूनच सुरुवात होणार आहे. प्रामुख्याने कोवाण व मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यात कोकणसह पुणे, कोल्हापूर घाटमाध्याला हा इशारा दिला आहे.
३१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंतचे अलर्ट
ऑरेंज अलर्ट : ठाणे (३), रायगड (१ ते ३), रत्नागिरी (१ ते ३), सिंधुदुर्ग (२, ३), पुणे (१ ते ३), कोल्हापूर (१ ते ३), सातारा (१ ते ३), चंद्रपूर (२), गडचिरोली (२), गोंदिया (२), नाशिक (३). बलो अलर्ट : ठाणे (३१.१. २), मुंबई (१ ते ३), सिंधुदुर्ग (१). धुळे, नंदुरबार, जळगाव (३), नाशिक (२). पुणे (३१), कोल्हापूर (३), सातारा (३१), छत्रपती संभाजीनगर (३), जालना (२, ३), परभणी (३), हिंगोली (२, ३), नांदेड (२, ३), लातूर (३), अकोला ३१, १, २, ३).