Train Accident News – रेल्वे अपघाताची मालिका सुरूच, काचंनजंगा एक्सप्रेस घसरली तिथेच मालगाडीचा अपघात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जुलै ।। भारतात ट्रेनच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. 17 जूनला कांचनजंगा एक्सप्रेसचा अपघात झाला होता. आता त्याच ठिकाणी मालगाडी घसरली आहे. सिलिगुडीजवळ असलेल्या रंगपानी स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे.

17 जूनला पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसली होती. या अपघातात लोकोपायलटसह प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ज्या ठिकाणी हा अपघाता झाला होता, त्याच ठिकाणी मालगाडी घसरली आहे. एक मालगाडी रंगपानी स्थानकाजवळ रुळावरून घसरली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. इथली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *