महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑगस्ट ।। 25 जुलै जागतिक आय व्ही एफ दिवस म्हणून साजरा केला जातो, या दिवशी पहिले आय व्ही एफ बाळ(लुईस ब्राऊन) जन्माला आले.. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील वीर आय व्ही एफ सेंटर कडून , तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करणे व वंध्यत्वाची समस्या असणाऱ्या जोडप्यामध्ये आशा निर्माण करणे यासाठी आय व्ही एफ दिवस साजरा करण्यात आला.. तसेच 25 जुलै ते 31 जुलै कॅम्प भरवण्यात आला होता, त्याचा अनेक जोडप्यांनी लाभ घेतला..
वीर आय व्ही एफ कडून 30 जुलै रोजी वाकड येथील Hotel Ambience excellency मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..
डॉ जया देवानी आहार तज्ञ यांनी स्त्रियांचे pcos या आजारामध्ये कोणता आहार घ्यावा या विषयी मार्गदर्शन केले तसेच पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमी संख्या असतांना किव्हा वंध्यत्व, ज्या पुरुषांच्या विर्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी आहे त्यांनी आपली जीवनशैली व सकस आहाराचे नियोजन कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले.
तर डॉ, सविता गायकवाड यांनी मानसिक ताण तणाव यावर नियंत्रण कसे ठेवता येईल या विषयी मार्गदर्शन केले..
डॉ किशोर गोसावी यांनी वंध्यत्व व्यवस्थापणात इंडोस्कोपीक शस्त्रक्रिया या विषयी माहिती दिली..
डॉ राहुल वीर यांनी आय व्ही उपचार पद्धती व नवीन ए आर टि कायद्याचा प्रभाव यावर मार्गदर्शन केले…
या कार्यक्रमात आलेल्या अनेक जोडप्यांनी त्यांचे आय व्ही एफ प्रक्रिये दरम्यान आलेले अनुभव व आपले मनोगत व्यक्त केले, तसेच डॉ राहुल वीर व सर्व वीर आय व्ही टीम चे आभार व्यक्त केले..