महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑगस्ट ।। मुसळधार पावसाचा तडाखा राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे पुणे तसेच कोल्हापूरमध्ये पुरपरिस्थिती नर्माण होऊन अनेकांचे मोठे नुकसान झाले. गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र राज्यात 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. आज रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 5 ऑगस्ट पासून कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 1 ऑगस्टला रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई आणि ठाणे या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.