महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ६ ऑक्टोबर |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
काही प्रश्न मार्गी लावाल. मुलांच्या बाबत चिंता लागून राहील. सामाजिक वादात पडू नका. दिवसभर धावपळ करावी लागेल. गरजूंना मदत केल्याचा आनंद मिळेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
कुटुंबासोबत दिवस मजेत घालवाल. बोलण्यातून लोकांना प्रभावित कराल. वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल. आर्थिक बाजू स्थिरावेल. कामातील अडचणी दूर करू शकाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
जोडीदाराकडून लाभ होईल. आवडती वस्तु बरेच दिवसांनी सापडेल. आपल्या मनाप्रमाणे दिवस घालवाल. व्यापारात नवीन भागीदार सापडेल. अनेक जबाबदार्या पार पाडाल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope )
विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या. कृतीत सामंजस्य आणावे. त्यामुळे मार्ग सहज सापडेल. कुटुंबासाठी खर्च कराल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
मित्रांकडून अनपेक्षित लाभ संभवतात. सर्व गोष्टीतून आनंद शोधाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. सहकार्यांशी वादात पडू नका. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
कामातील बदल लक्षात घ्या. घरातील मोठ्यांचे म्हणणे ऐका. सहकारी वर्गाची मदत घ्याल. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. आर्थिक स्थिती चांगली राहील.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
कामानिमित्त छोटे प्रवास होतील. कामाच्या ठिकाणी वाहवा होईल. मान,सन्मान वाढीस लागेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. विरोधक पराभूत होतील.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
आरोग्याची वेळच्यावेळी काळजी घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कार्यालयीन वातावरण चांगले राहील. तुमचा उद्देश साध्य होईल. सारासार विचार करून घेतलेला निर्णय योग्य ठरेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
भागीदारी व्यवसायाचे लाभ मिळतील. कामात सहकारी स्वखुशीने मदत करतील. द्विधा मन:स्थितीतील निर्णय पुढे ढकला. वैचारिक दिशा बदलून पहा. भावंडांची मदत घ्याल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope )
नवीन नोकरीसाठी बोलावणे येईल. घरात वादग्रस्त प्रसंग टाळा. मेहनतीला पर्याय नाही. कामात झालेले नुकसान भरून काढाल. नवीन योजना आखताना सावधानता बाळगा.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
विद्यार्थ्यांना उत्तम काळ. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडाल. नातेसंबंध दृढ होतील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
घरासंबंधी कामे मार्गी लावा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. फटकून बोलू नका. घरातील वातावरण खेळकर राहील. ज्ञान वाढीस लागेल.