Gold Silver Rate Hike (2 August 2024) : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑगस्ट ।। सोने आणि चांदीचे दर गेल्या काही दिवसांत कमी झाले होते. मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून सोने आणि चांदीचा भाव पुन्हा एकदा वाढला आहे. ७० हजारांहून ६७ हजार रुपये प्रति तोळ्यावर गेलेले सोन्याचे दर पुन्हा एकदा ७० हजारांवर पोहचले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्याआधी तुमच्या शहरातील आजचा भाव काय आहे? त्याची माहिती जाणून घेऊ.

२२ कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे १०० ग्राम सोन्याचा भाव थेट ६,४६,६०० रुपयांवर पोहचला आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव ६४,६६० रुपये प्रति तोळा आहे. तसेच ८ ग्राम सोन्याचा भाव ५१,७२८ रुपये आहे. १ ग्राम सोन्याचा भाव ६,४६६ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव
आज २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ७,०५,२०० रुपये आहे. १० ग्राम म्हणजे एक तोळा सोन्याची किंमत ७०,५२० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव ५६,४१६ रुपये इतका आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ७,०५२ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती किती
आज १८ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ५,२९,१०० रुपये आहे. १० ग्राम सोन्याचा भाव ५२,९१० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव ४२,३२८ रुपये आणि १ ग्राम सोन्याची किंमत ५,२९१ रुपये आहे.

विविध शहरांमधील १ ग्राम सोन्याचा आजचा भाव

मुंबई

२२ कॅरेट – ६,४५१ रुपये

२४ कॅरेट – ७,०३७ रुपये

पुणे

२२ कॅरेट – ६,४५१ रुपये

२४ कॅरेट – ७,०३७ रुपये

पटनामध्ये

२२ कॅरेट – ६,४५६ रुपये

२४ कॅरेट – ७,०४२ रुपये

जयपूरमध्ये

२२ कॅरेट – ६,४६६ रुपये

२४ कॅरेट – ७,०५२ रुपये

लखनऊत

२२ कॅरेट – ६,४६६ रुपये

२४ कॅरेट – ७,०५२ रुपये

चांदीचा भाव

सोन्यासह चांदीचा भाव सुद्धा आता वाढत चालला आहे. आज चांदी १०० रुपयांनी महागली आहे. त्यामुळे आजचा भाव ८७,२०० रुपये आहे. लखनऊमध्ये देखील ८७,२०० रुपये किलो दराने चांदी विकली जात आहे.

पटनामध्ये ८७,२०० रुपये किलो, नवी दिल्लीमध्ये ८७,२०० रुपये किलो, जयपूरमध्ये ८७,२०० रुपये किलो, कोलकत्तामध्ये ८७,२०० रुपये किलो आणि लुधियानामध्ये सुद्धा ८७,२०० रुपये किलो दराने चांदी विकली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *