महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट ।। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात नवीन कर प्रणाली आर्थिक वर्ष २०२३-२१ ( मूल्यांकन वर्ष २१-२२) पासून लागू झालेली जी आता हळूहळू लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. गेल्या वर्षासाठी आयटीआर (आयकर रिटर्न) फाईल करण्याची मुदत आता संपली असून मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी विक्रमी संख्ये प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्यात आले. एवढेच नाही तर आता आयकर विभागाच्या माहितीनुसार नवीन करप्रणाली अनेकांची पहली पसंत बनली आहे.
नवीन कर प्रणालीकडे करदात्यांचे झुकते माप
मूल्यांकन वर्ष २०४२-२५ मध्ये एकूण ७२ % करदात्यांनी नवीन कर अंतर्गत रिटर्न भरले आणि केवळ २८ टक्के करदात्यांना जुन्या करप्रणालीत आयटीआर दाखल केले. आयकर विभागाने नुकत्याच जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी विक्रमी संख्येने आयटीआर दाखल करण्यात आले असून ३१ जुलैच्या अंतिम मुदतीपर्यंत ७.२८ कोटींहून अधिक टॅक्स रिटर्न दाखल गेले, जो एक नवीन विक्रम आहे.
The Income Tax Department appreciates taxpayers & tax professionals for timely compliance, resulting in a record surge in the filing of Income Tax Returns (ITRs).
Here are the key highlights:
👉More than 7.28 crore ITRs for AY 2024-25 filed till 31st July, 2024, a 7.5% increase… pic.twitter.com/CzbgZEMUWi
— Income Tax India (@IncomeTaxIndia) August 2, 2024
गेल्या वर्षी याच कालावधीत ६.७७ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. आयकर विभागानुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी दाखल केलेल्या एकूण ७.२८ कोटी आयटीआरपैकी ५.२७ कोटी रिटर्न नव्या करप्रणाली अंतर्गत भरले गेले तर, जुन्या कर प्रणालीमध्ये भरलेल्या रिटर्नची संख्या २.०१ कोटी आहे.
दोन प्रकारच्या आयकर प्रणाली
सध्या देशभरात करदात्यांना टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी दोन, – जुनी आणि नवीन – कर व्यवस्थेचा पर्याय दिला जातो. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात नवीन कर व्यवस्था लागू करण्यात आली ज्याअंतर्गत ८०सी, ८०डी इत्यादी कर सवलती काढून टाकण्यात आलेल्या पण टॅक्स रेट कमी करण्यात आले. तसेच जुन्या पद्धतीत अनेक प्रकारच्या आयकर सवलती उपलब्ध आहेत परंतु कराचा दर जास्त असून जुन्या करव्यवस्थेत आयटीआर भरताना अनेक प्रकारची माहिती गोळा करावी लागत होती जी काहीवेळा खूप गुंतागुंतीची बनते.
नव्या करप्रणालीतील नवे बदल
अलीकडच्या अर्थसंकल्प (बजेट २०२४) मध्ये नवीन करप्रणालीत तीन लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर लागू करण्यात आला तसेच शिथिलता आणखी वाढवली गेली. पुढील वर्षांपासून नव्या टॅक्स प्रणालीत रिटर्न्स फाईल करणाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शन ५० हजारऐवजी ७५,००० रुपयांचा लाभ मिळेल. याशिवाय आयकर स्लॅबमध्येही बदल केले गेले असून यानुसार आता ३ लाख ते ७ लाखांच्या उत्पन्नावर ५% टॅक्स लागेल जो यापूर्वी सहा लाखांपर्यंत होता.