Gold Bond: गोल्ड बाँडमधील गुंतवणूक 8 वर्षांत झाली दुप्पट; 5 ऑगस्टला होणार पेमेंट, खात्यात किती पैसे येणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट ।। Sovereign Gold Bonds: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 5 ऑगस्ट 2016 रोजी जारी केलेल्या सार्वभौम सुवर्ण रोख्यांचे (सॉव्हरिन गोल्ड बाँड – एसजीबी) पेमेंट 5 ऑगस्ट 2024 रोजी करणार आहे. 2016 मध्ये हे रोखे 3119 रुपये प्रति ग्रॅम दराने जारी करण्यात आले होते. तर आता या बाँडवर, प्रति बाँड 6938 रुपये मिळणार आहेत.

याचा अर्थ गुंतवणूकदारांना सुमारे 12 टक्के परतावा मिळत आहे आणि 8 वर्षांत पैसे दुप्पट झाले आहेत. कस्टम ड्युटी 9 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे सोन्याचे दर खाली आले आहेत.

सार्वभौम सुवर्ण रोखे हे सरकारच्या वतीने केंद्रीय बँक RBI द्वारे जारी केलेले सरकारी रोखे आहेत. हे फक्त भारतीय निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना विकले जाऊ शकतात.

वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळते
सार्वभौम सुवर्ण योजनेत, बाँडधारकांना वार्षिक 2.5 टक्के व्याज देखील मिळते. हे व्याज आयकर कायदा, 1961 अंतर्गत करपात्र आहे. सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करावी लागते. कोणतीही व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब जास्तीत जास्त 4 किलोपर्यंतचे सोने रोखे खरेदी करू शकतात. ट्रस्ट आणि तत्सम संस्थांसाठी खरेदीची कमाल मर्यादा 20 किलो आहे.

सार्वभौम सुवर्ण रोखे संयुक्तपणे किंवा अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने खरेदी केले जाऊ शकतात. बाँडचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षे आणि लॉक इन कालावधी 5 वर्षे आहे.

खरेदीच्या तारखेपासून 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढील व्याज भरण्याच्या तारखेला बॉण्डची मुदतपूर्व पूर्तता करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. गरज भासल्यास, गुंतवणूकदार सार्वभौम गोल्ड बाँडवर कर्ज देखील घेऊ शकतो.

किमान 12 टक्के परतावा देण्याचे सरकारचे आश्वासन
अलीकडील बाजारातील घसरण आणि अर्थसंकल्प 2024 मध्ये सोन्यावरील कस्टम ड्युटी 9 टक्क्यांनी कमी करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे SGB गुंतवणूकदारांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण आहे.

गोल्ड बाँड योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कमी परतावा मिळण्याची भीती गुंतवणूकदारांना वाटते. महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी 30 जुलै रोजी आश्वासन दिले होते की SGB किमान 12 टक्के परतावा देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *