महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट ।। फास्टॅगच्या वापरासंबधित नियमांत महत्त्वाचे बदल झालेले आहेत. या नियमांनुसार दर पाच वर्षांनी वाहनधारकांना फास्टॅग बदलावे लागणार आहेत. तसेच दर तीन वर्षांनी के. वाय. सी. अपडेट करावी लागणार आहे. फास्टॅग पुरवणाऱ्या संस्था ही प्रक्रिया वाहनधारकांना सुटसुटीत राहील, अशा पद्धतीने अंमलात आणणार आहेत. 
नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बदल
नॅशनल पेमेंट कॉप्रोरेशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे बदल केले जात आहेत. टोलवरील शुल्क आकारणी सुटसुटीत व्हावी आणि टोल नाक्यांवरील गर्दी कमी व्हावी, यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. (FASTag New Rule)
फास्टॅगमध्ये करण्यात आलेले नियम
फास्टॅगमध्ये (FASTag New Rule) करण्यात आलेले नियम पुढील प्रमाणे आहेत.
१. पाच वर्षं जुने फास्टॅग बदलावे लागणार
२. फास्टटॅग जर ३ वर्षं जुना असेल तर केवायसी अपडेट करावी लागेल.
३. वाहन नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक फास्टॅगशी लिंक करावा लागणार
४. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर ९० दिवसांत नोंदणी आवश्यक
५. फास्टॅग पुरवणाऱ्या कंपन्या त्यांचा डेटाबेस व्हेरिफाय करतील.
६. वाहनाचा फ्रंट आणि साईडचा फोटो अपलोड करावा लागणार
७. फास्टॅग मोबाईल क्रमांशी लिंक केलेला असला पाहिजे.