महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑगस्ट ।। पुण्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. मध्यवर्ती भागासह उपनगरात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसत आहे. खबरदारी म्हणून पुण्यातील घाटमाधा परिसरात न जाण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. मुठा नदीच्याही पाणी पातळीत वाढ झाली असून येरवडा परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.