महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑगस्ट ।। आषाढ महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज ‘गटारी’च्या नावाने ओळखली जाणारी आषाढी अमावस्या साजरी केली जाते. आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण महिना सुरू होतो. त्यामुळे अनेकजण गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे आज गटारी अमावस्येच्या दिवशी मासांहारवर मात्र मनसोक्त ताव (Gatari Amavasya 2024) मारतात. त्यामुळेच पुण्यात देखील ‘गटारी’ साजरी करण्याचं जोरदार नियोजन दिसत आहे. त्यासाठी पुणेकरांनी सकाळपासूनच मटणाच्या दुकांनाबाहेर रांगा लावल्याचं दिसत आहे.
गटारी आली…
महत्वाचं म्हणजे, रविवारचा योग साधून आलाय. त्यामुळे अनेकांनी आज जोरदार ‘गटारी’ साजरी करण्याचं नियोजन केलंय. त्याच निमित्ताने पुण्यात देखील चिकन, मटण दुकानाच्या बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळत (Ashadhi Amavasya) आहेत. गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेकजण मटण खात नाहीत. त्यामुळेच आज पुणेकरांनी मटण खरेदीसाठी दुकानांबाहेर मोठी गर्दी केलीय