Uric Acid: शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी करू शकतात ‘हे’ औषधीयुक्त हिरवे प

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑगस्ट ।। शरीरात युरिक ॲसिडचे अधिक असल्यास सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. यामुळे वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही पुढील काही पानांचा आहारात समावेश करू शकता. ज्यामुळे युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होते. तसेच हे पाने आतड्यांपासून ते किडनीपर्यंत सर्वांसाठा फायदेशीर आहे.

शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असेल तर अनेक समस्या निर्माण होतात. सांधेदुखी, किडनीसंबंधित आझार निर्माण होऊ शकते. यामुळे याचे वेळीच लक्षण ओळखून उपचार केले पाहिजे. पुढील औषधीयुक्त पानांचे सेवन केल्यास युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होऊ शकते.

विड्याचे पान
विड्याच्या पानांचा रस रक्तातील युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मगत करते. तसेच शरीराच्या अनेक समस्या दूर ठेवते. तुम्ही नियमितपणे सेवन केल्यास सुरिक अ‍ॅसिडची समस्या कमी होऊ शकते. हे पाना चावून खावे.

आवळा किंवा शेवग्याचे पान
शेवगा आणि आवळ्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असते. यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत मिळते. तुम्ही या पानांचे सेवन भाजी, चटणी बनवून करू शकता.

मेथी
मेथीटे पान युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. या पानाचे सेवन चावून किंवा पाण्यात उकलून करू शकता. तसेच रोजच्या आहारात भाजी, चटणी, पराठा यासारख्या पदार्थांमध्ये करू शकता. ही पाने शरीराला डिटॉक्स करतात.

कोथिंबीर
कोथिंबीरमध्ये असलेले पोषक घटक शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी करते. तुम्ही याचे सेवन भाजी, वडे यासारखे पराठे बनवून सेवन करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *