Pune Traffic: पुण्यात १२ ऑगस्टपर्यंत ‘या’ वाहनांवर बंदी, ३० ठिकाणी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत नियम लागू…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट ।। सोमवारपासून १२ ऑगस्टपर्यंत पुणे शहरातील ३० प्रमुख वाहतूक चौक आणि ठिकाणी अवजड वाहनांवर बंदी लागू केली जाणार आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक समस्या काही प्रमाणात सोडविण्यात येणार आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी एक अधिसूचना जाहीर करून शहरातील ३० प्रमुख ठिकाणी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत अवजड वाहनांवर बंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे शहरातील गंभीर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात आली आहे.

पावसामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी-
या बंदीचा निर्णय सततच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या रस्त्यांच्या दुर्दशामुळे घेण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यांचा अपुरी दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक समस्येत वाढ झालेली आहे.

वाहतूक व्यवस्थापन-
हा बंदीचा नियम अवजड वाहनांसाठी असला तरी आपत्कालीन सेवांमध्ये सहभागी वाहनांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. रविवारी रात्री डीसीपी ट्रॅफिक रोहिदास पवार यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेत हे स्पष्ट केले आहे की, सततच्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

बंदीचे ठिकाणे-
या बंदीचा नियम trucks, dumpers, concrete mixers आणि इतर अवजड वाहनांवर लागू होईल. पुण्यातील ३० प्रमुख वाहतूक चौक आणि ठिकाणी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत या वाहनांवर बंदी लागू राहील.

यामध्ये पुढील ठिकाणांचा समावेश आहे-
संचेती चौक, पौड फाटा चौक, राजाराम पूल, दांडेकर पूल, निलायम पूल, सावरकर पुतळा चौक, लक्ष्मी नारायण सिनेमा चौक, सेव्हन लव्ह्स चौक, पंडोल अपार्टमेंट चौक, खणे मारुती चौक, पावर हाऊस चौक, आरटीओ चौक, पाटील इस्टेट चौक, ब्रेमन चौक, शास्त्री नगर, आंबेडकर चौक, चंद्रमा चौक, मुंढवा चौक, नोबेल चौक, लुल्लानगर ते गोळीबार मैदान, लुल्ला नगर ते गंगाधाम, पुष्पा मंगल चौक, राजास सोसायटी, पोल्ट्री चौक, उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, अभिमनाश्रे बाणेर आणि अभिमनाश्री पाषाण.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *