Recharge Plan : शंभर रुपयांचा रिचार्ज अन् चक्क 35 दिवसांची वैधता ;अनलिमिटेड कॉलिंग आणि ….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑगस्ट ।। भारतातील खाजगी नेटवर्क कंपन्यांनी 3 जुलैला त्यांचे रिचार्ज दरांमध्ये मोठी वाढ केली त्यामध्ये एअरटेल,जिओ आणि वोडाफोन आयडिया म्हणजेच vi यांचा समावेश होता.या दरवाढीमुळे ग्राहक वर्ग प्रचंड नाराज आहे.

अनेक ग्राहक अन्य स्वस्त रिचार्ज प्लान असलेल्या नेटवर्ककडे वळत आहेत. अशात सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी BSNL ने आपल्या किफायतशीर रिचार्ज प्लॅन्समुळे देशभरात धमाका केला आहे. जियो, एअरटेल आणि वोडाफोन-आइडिया यांसारख्या खासगी कंपन्यांनी आपल्या प्लॅन्सच्या दरात वाढ केली असताना, BSNL ने आपल्या ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी अनेक किफायतशीर प्लॅन्स आणले आहेत.

त्यातीलच एक म्हणजे फक्त १०७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन. या प्लॅनमध्ये तुम्हाला ३५ दिवसांची वैधता मिळते. अन्य कंपन्यांच्या तुलनेत ही एक मोठी बाब आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगऐवजी २२० मिनिटांची कॉलिंग सुविधा मिळते. पण हो, या प्लॅनमध्ये डेटा फक्त ३GB आहे.

जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल तर BSNL चा १०८ रुपयांचा प्लॅनही तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला रोज १GB डेटा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा २८ दिवसांसाठी मिळते.

दरम्यान, BSNL ने आपल्या ग्राहकांना आणखी एक मोठी भेट दिली आहे. त्यांनी देशभरात आपली 4G सेवा सुरू केली आहे. यामुळे देशभरात उच्च गती इंटरनेट पोहोचवण्याच्या दिशेनं महत्त्वाची पाऊलं उचलली गेली आहेत. याशिवाय कंपनीने 5G तंत्रज्ञानाच्या चाचण्याही सुरू केल्या आहेत.

BSNL ने आतापर्यंत १५ हजारांहून अधिक 4G साइट्स सक्रिय केल्या आहेत. या सर्व साइट्समध्ये भारतातच तयार केलेले उपकरणे वापरण्यात आली आहेत. यामुळे बीएसएनएलची 4G सेवा पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे.

BSNL च्या या कदमांमुळे देशातील दूरसंचार क्षेत्रात नक्कीच चांगली स्पर्धा निर्माण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *