महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑगस्ट ।। ५० किलो वजनी गटात १०० ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळे भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिंपिकमधून अपात्र ठरवण्यात आलं. यानंतर वनेशची तब्येत बिघडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संपूर्ण भारतीय गोल्ड मेडलकडे लक्ष ठेवून असताना हा सगळा प्रकार घडला. मात्र यानंतर विनेश फोगट हिने कुस्तीला अलविदा केला आहे. विनेश सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकून निवृत्तीची घोषणा केली.