महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑगस्ट ।। सोलापूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित सभेत महायुतीला इशारा दिला आणि मराठा समाजाला आवाहन केले. आपल्या जोरदार भाषणात त्यांनी स्पष्ट केले की, ‘तुम्ही जर जातिवंत मराठा असाल तर कोणत्याच पक्षाच्या बाजूने बोलू नका. मला असे वाटते, माझी जात मोठी झाली पाहिजे, माझ्या जातीतली मुलं मोठी झाली पाहिजेत.’ जरांगेंनी स्पष्ट सांगितले की, मराठा समाजाने आपली ताकद ओळखावी आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढावे.
मनोज जरांगेंनी पक्षविरहित विचारसरणीवर जोर दिला. ‘आम्ही मराठे बाप जातीला मानतो, आणि तुम्ही पक्षाला मानता. हा तुमच्या आणि आमच्या संस्कारामधील फरक आहे.’ असा जोरदार वक्तव्य करत त्यांनी मराठा समाजाला जातिवंत मराठा म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले. ‘पक्षाच्या आणि नेत्यांच्या बाजूने नसेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कट्टर मराठा यापुढे घरात बसू शकत नाही,’ असेही त्यांनी ठासून सांगितले. मनोज जरांगेंनी केलेल्या भाषणाला सोलापूरमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाला.