महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट ।। पुणे – सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलच्या समोर धावत्या बस ने पेट घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बस चे संपूर्ण नुकसान झाले आहे.
सदरची घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाजण्याच्या सुमारास घडली आहे .या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदरची बस हैदराबाद वरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बस मध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करीत होते.
कदम वस्ती ग्रामपंचायत आले असता गाडीचा टायर फुटला व गाडीने पेट घेतला. या आगीत गाडीचे पूर्ण नुकसान झाले असून पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या वेळी महामार्ग दोन्ही बाजुंनी बंद ठेवण्यात आला होता.