महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट ।। आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कथित मद्यघोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मनिष सिसोदिया यांना जामीन मंजूर केला आहे. तब्बल १८ महिन्यानंतर मनिष सिसोदिया हे अखेर जेलमधून बाहेर येणार आहेत.
मनिष सिसोदिया यांना गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. अखेर १८ महिन्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सिसोदिया यांना १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. ईडी आणि सीबीआय प्रकरणात सिसोदिया यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा बाँड भरावा लागणार असून ते आता तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
Supreme Court grants bail to AAP leader Manish Sisodia in the excise policy irregularities case pic.twitter.com/5alhh0uL5l
— ANI (@ANI) August 9, 2024
मनिष सिसोदिया यांना ट्रायल कोर्टात पाठवण्याची ईडीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे हे ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टाने समजून घ्यायला हवे. खटला पूर्ण केल्याशिवाय कोणालाही तुरुंगात ठेवता येत नाही आणि शिक्षाही करता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने त्यांना पासपोर्ट सरेंडर करण्याची आणि साक्षीदारांवर प्रभाव न टाकण्याची अट घातली आहे.