महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ७ ऑक्टोबर |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope )
बरेच दिवसांपासून राहिलेले काम पूर्ण होईल. दिवस सत्कारणी लावल्याचा आनंद मिळेल. उत्तम आरोग्यदायी दिवस. काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
आपल्या दिवसाला गती देणारे कार्य घडेल. प्रशंसेस पात्र व्हाल. मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दीर होतील. घरातील कामात गुंग व्हाल. तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. आरोग्यात सुधारणा होईल. कौटुंबिक समस्या सामंजस्याने हाताळा.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
आपल्या कालगुणांना वाव मिळेल. व्यवसायात जपून निर्णय घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. भावनिक गुंता वाढवू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
सामाजिक कामासाठी वेळ द्याल. जोखीम पत्करून काम कराल. स्थावर खरेदी-विक्रीचे व्यवहार पुढे सरकतील. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope )
समोरच्या व्यक्तीची समजूत काढावी लागेल. दैनंदिन कामात बदल करून पाहावं. व्यापारी वर्ग खुश राहील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope )
आर्थिक व्यवहारात संभ्रम टाळावा. अपुर्या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका. बोलण्याची घाई करू नका. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष ठेवा. नियोजित कामात बदल करू नका.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope )
मानसिक स्वास्थ्य जपावे. विचारांना योग्य दिशा द्यावी. प्रिय व्यक्तिला दुखवू नका. मित्राची योग्य साथ मिळेल. गरजूंना मदत कराल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. दिवसाचा बराच काळ कामात गुंतून राहाल. भावंडांशी नाते दृढ होईल. वडीलधार्यांचे मार्गदर्शन घ्यावे. विवाह इच्छुक मंडळींना नवीन स्थळे येतील.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope )
बरेच दिवस राहून गेलेले काम पूर्ण होईल. मित्रांशी वाद संपुष्टात येतील. मानसिक शांतता लाभेल. अति कर्मठपणे वागू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
करमणुकीत बराच काळ घालवाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आपली प्रतिमा जपावी. घरातील सदस्यांचा सल्ला घ्यावा. वादाचे मुद्दे दुर्लक्षित करा.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
घराची कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ संभवतो. रागावर ताबा ठेवावा. ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद लाभेल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल.