महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ७ ऑक्टोबर | जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता, रशिया -युक्रेन युद्ध आणि जिओ पोलिटिकल अस्थिरता यामुळे चांदीच्या भावात (Silver Rate) एका वर्षात जवळपास 70 हजार रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. खामगाव येथील चांदीच्या (Silver Rate Today) बाजारपेठेत आज एक किलो चांदीसाठी 1 लाख 55 हजार 500 रुपये मोजावे लागतं आहेत. दिवसेंदिवस चांदीचे भाव वाढतच असून दिवाळीपर्यंत चांदीचे भाव एक लाख 70 हजार रुपये प्रती किलोपर्यंत जाण्याची शक्यता सरफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दिवसेंदिवस भाव वाढत असले तरीही चांदी खरेदी करण्यासाठी मात्र ग्राहकांची गर्दी वाढतच आहे. तर जुनी चांदी देऊन अनेक जण नफा कमवत असल्याचेही सराफा व्यापाऱ्यांनी सांगितल आहे.
गेल्या वर्षभरात चांदीचे भाव कधी आणि किती होते (Gold Silver Rate Update)
-07 Oct – 2024 – 88 हजार रु प्रति किलो.
-1 Jan – 2025 – 99 हजार 500 रु प्रति किलो.
-1 March 2025 – 1 लाख 01 हजार रु प्रति किलो.
-1 Jun 2025 – 1लाख 10 हजार रु प्रति किलो.
-1 Sept 2025 – 1 लाख 40 हजार रु प्रति किलो.
दिवसेंदिवस चांदीचे भाव वाढत असल्याने व आगामी सण आणि लग्नसराईच्या अनुषंगाने अनेकांचे बजेटही कोलमडल्याचं दिसत आहे. खामगाव येथील चांदीची बाजारपेठ ही देशभरात प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे देशभरातून ग्राहक खामगाव येथे चांदी खरेदीसाठी येत असतात.
गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात पुन्हा 1500 रुपयांची वाढ (Gold price rises again by Rs 1500 in 24 hours)
चांदी प्रमाणेच सोन्याच्या दारात देखील मोठी वाढ होत असल्याचे चित्र आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या मागणीत वाढ होऊन सोन्याच्या दराने, सगळे उच्चांक मोडल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा पंधराशे रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर हे जी एस टी शिवाय 120000 तर जीएसटी सह 1,23,800 इतक्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत.
सोन्याच्या दराने दरवाढीचे सगळे उच्चांक मोडले (Gold Silver Rate Today)
सोन्याचा दर वाढीचा विचार केला तर रशिया-युक्रेन युद्ध, इजरायल-गाजा युद्ध,अमेरिकन फेडरल बँकेने कमी केलेले व्याजदर, अमेरिकेत सुरू झालेले शट डाऊन, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून, आपली गुंतवणूक सुरक्षित रहावी यासाठी अनेक देशांच्या सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणात सुवर्ण खरेदी सुरू केली आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने, सोन्याच्या दराने ही दर वाढीचे सगळे उच्चांक मोडले असल्याचं पाहायला मिळत आहे.
तर एन दिवाळी आणि लगीन सराईच्या तोंडावर मोठी दर वाढ झाली असल्याने, सोने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या, सर्व सामान्य ग्राहकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पुढील काळात अजूनही सोन्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी दिला आहे.