मनोरंजन विश्वातील विनोदवीर हरपला ; प्रख्यात अभिनेते विजय कदम यांचं निधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट ।। मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. मराठी सिनेमा, मालिका आणि रंगभूमी गाजवणारे हरहुन्नरी अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे. गेले काही दिवस ते कॅन्सर सारख्या आजाराची झुंज देत होते. पण त्यांच्यावरील उपचार अयशस्वी ठरले आणि अखेर आज त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अंधेरीच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमी येथे आज दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.

साधारण वर्षभर त्यांच्यावर कॅन्सर संबधीत उपचार सुरू होते. गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये त्यांची सर्जरी देखील करण्यात आलेली. ते हळू हळू बरे होत होते. मात्र या वर्षी जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान त्यांना एॅसिडिटीचा अटॅक आला. विजय कदम आजारी असल्याचे वृत्त समोर आल्यापासून त्यांच्या चाहत्या वर्गात चिंतेचे वातावरण होते. आपला लाडका अभिनेता या भयंकर आजारातून बरा व्हावा यासाठी चाहत्यांच्या प्रार्थनाही चालू होत्या मात्र आज सर्व काही अपयशी ठरले.

विजय कदम यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा गंधार आहे. मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नी व मुलाने त्यांना खंबीर साथ दिली असे सांगितले होते. विजय कदम यांच्यावर चार किमोथेरपी आणि दोन सर्जरी झाल्या होत्या. विजय कदम शेवटचे ती परत आलीये या मराठी मालिकेत दिसलेले. याशिवाय त्यांनी हळद रुसली कुंकू हसलं, चष्मेबहाद्दूर, पोलीसलाईन या सिनेमातही काम केलेले. तर रंगभूमीवर विच्छा माझी पुरी करा , टूर टूर, आमचं नाव बाबुराव यांसारखी नाटकं गाजवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *