पहिल्या कसोटीत होल्डर चा होल्ड ; इंग्लंडचा 4 गडी राखत सहज पराभव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – साउदम्पटन – वेस्ट इंडिजने कोरोनाच्या सावटात खेळवल्या गेलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत यजमान इंग्लंडचा 4 गडी राखून सहज पराभव केला व तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. संघाला एकहाती विजय मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जेरेमी ब्लॅकवूडचे शतक केवळ 5 धावांनी हुकले.

जगभरातील क्रिकेट मार्च महिन्यापासून कोरोनाचा धोका वाढल्यामुळे ठप्प होते. अशा स्थितीत हा सामना प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी न देता रिकाम्या मैदानावर खेळवला गेला. वेस्ट इंडिजने पहिल्या दिवसापासूनच सामन्यावर वर्चस्व राखले. द्विशतकी धावांवर इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आणल्यानंतर आपल्या पहिल्या डावात त्यांनी त्रिशतकी धावा करत शतकी आघाडी घेतल्यानंतर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावातही सावध फलंदाजी करत असलेल्या इंग्लंडला मोठी आघाडी घेऊन देता त्रिशतकी धावांवर संपवला व विजयासाठी आवश्‍यक असलेल्या 200 धावा सहज पार करत एक शानदार विजय मिळवला.

सुरुवातीला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने बळी घेत पाहुण्यांवर वर्चस्व राखले, पण त्यानंतर रॉस्टन चेस व ब्लॅकवूड ही जोडी जमली. चौथ्या विकेटसाठी त्यांनी 73 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाचा विजय दृष्टीपथात आणला. बेन स्टोक्‍सने डॉवरीचला बाद केले. त्यानंतर ब्लॅकवूडला कर्णधार जेसन होल्डरने सुरेख साथ दिली. दरम्यान ब्लॅकवूडने आपले अर्धशतक पूर्ण करुन शतकाकडे कूच केली होती. पण अवघ्या 5 धावांनी त्याचे शतक हुकले.

आर्चरने वेस्ट इंडिजचा दुसरा डाव सुरू झाल्यानंतर सुरुवातीलाच घेतलेल्या 3 बळींमुळे एकवेळ सामन्यात रंगत आली होती. त्यावेळी इंग्लंडलाही विजयाची संधी होती. पण संयमी फलंदाजी करत ब्लॅकवूडने इंग्लंडच्या हातातून विजय खेचून आणला. आर्चरच्या यॉर्करवर जायबंदी झालेला जॉन कॅम्बेल पुन्हा फलंदाजीसाठी आला व त्याने होल्डरला साथ देत संघाचा विजय साकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *