Ration ; रेशन दुकानदाराचा ‘असा’ घोटाळा पाहून चक्रावून जाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑगस्ट ।। अत्यल्प गटाला सहकार्याच्या भूमिकेतून सरकारकडून धान्य वाटप करण्यात येते.रेशन दुकानदार माध्यमातून नागरिकांना धान्य मिळते. पण रेशन दुकादारांचा हव्यास इतका वाढतो की ते मेलेल्या माणसाच्या टाळूवरची लोणी खाल्ल्याप्रमाणे वागतात. भंडारामध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. गावातील मृत व्यक्तीच्या नावाने केली रेशन दुकानदारांकडून धान्याची उचल केली जायची. असे करत बाहेर गावातील लोकांचेदेखील रेशन कार्ड तयार करण्यात आले होते. हा प्रकार कसा उघडकीस आला? या प्रकरणाचे पुढे काय झाले? यावर आता कारवाई होणार का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

भंडाऱ्यात रेशन घोटाळा
भंडारा तालुक्यातील गराडा खुर्द गावातील रेशन दुकानदार मागील अनेक वर्षापासून मेलेल्या लोकांच्या टाळूवरची लोणी खातोय, असा आरोप नागरिकांनी केलाय. असं म्हणण्यामागे कारणंही तसंच आहे. गराडा येथील अनेक नागरीक मृत झाले. यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला धान्य मिळणं बंद झालं. पण तालुका पुरवठा विभागाकडून रेशन दुकानात मृत व्यक्तीच्या नावाने धान्य दिलं जातं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मृत व्यक्तीच्या नावाने घ्यायचा धान्य
इतकंच नव्हे तर सरपंचांच्या सासू 3 वर्षापूर्वी मृत झाल्या पण त्यांच्या नावाने धान्य रेशन दुकानदार उचल घेत होता. जेव्हा सरपंचांनी रेशनच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने पाहणी केली तेव्हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात आणखी खोलवर माहिती गोळा करण्यात आली. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होत गेले. गावातील रहिवासी नाही अशा लोकांच्या नावानेदेखील रेशन कार्ड बनविण्यात आले होते. गावातीलच नागरीक अंतोदय योजनेपासून वंचित आहेत मग बाहेरगावातील नगरिकांचे रेशन कार्ड कसे तयार झाले? रेशन कार्ड तयार होताना तालुका पुरवठा विभाग काय करत होता? कोणी रेशन कार्ड तयार केले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

जिल्हा पुरवठा विभाग करणार कारवाई
एका रेशन दुकानदार मागील अनेक वर्षापासून मृत व्यक्तींच्या नावाने धान्य घोतोय पण अन्न पुरवठा विभागाने साधी चौकशीदेखील केली नाही. गावकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली. आता तक्रारीच्या अनुषंगाने रेशन दुकानाची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीत अनेक त्रुटी आढळल्या असल्याने रेशन दुकानावरील कार्यवाही जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठविण्यात आली आहे. भंडाऱ्याचे तालुका पुरवठा अधिकारी सत्यम बांते यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. एका गावातीस असा प्रकार उघडकीस आला असून जर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानाची चौकशी केली तर आणखी ‘टाळूवरची लोणी खाणाऱ्या’ अनेक दुकानावर कारवाई होईल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *