महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑगस्ट ।। एखादी कठिणातील कठीण रेसिपी असो किंवा मग सोप्यातील सोपा पदार्थ. हल्ली युट्यूब अनेकांसाठीच एखाद्या शिकवणी वर्गाहून कमी नाही. एक असा शिकवणी वर्ग, जिथं जगाच्या टोकावर कोणतंही कौशल्य तुम्हाला पाहून शिकता येतं. व्हिडीओ स्वरुपात युट्यूबवर बहुविध प्रकारची माहिती उपलब्ध असून, मागील काही वर्षांमध्ये या माहितीचं स्वरुप आणि ती माहिती घेण्यासाठीचा Target Audience सुद्धा बदलल्याचं पाहायला मिळालं आहे.
युट्यूबवर हे बदल होत असतानाच सातत्यानं पसंती मिळणारे व्हिडी ओ ठरले ते म्हणजे पाककलांचे. विविध प्रांतांच्या, विविध देशांच्या खाद्यसंस्कृतींमध्ये डोकावण्यास भाग पाहणाऱ्या या पाककलांच्या व्हिडीओंची युट्यूबवर कमाल चलती पाहता येते. अशा या माध्यमावर नुकताच काहीसा खळबळजनक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला.
खाद्यपदार्थाच्या व्हिडीओनं खळबळ?
सदर प्रकार तेलंगणातील असल्याची माहिती समोर येत असून येथील एका युट्यूबरनं मोराचा रस्सा अर्थात Pecock Curry बनवण्याचा एक व्हिडीओ शेअर केला, ज्यानंतर पोलिसही चक्रावले. प्राथमिक माहितीनुसार सिरसिला जिल्ह्यातील प्रणय कुमार यांच्याविरोधात याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून, ‘तो’ व्हिडीओसुद्धा हटवण्यात आला आहे.
कोडम प्रणय कुमार असं या युट्यूबरचं नाव असून, त्यानं Traditional Pecock Curry चा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. दरम्यान, हा सर्व प्रकार पाहून वन्यजीव संरक्षक संघटनांनी या युट्यूबवर संपात व्यक्त केला असून, त्याचा व्हिडीओ हटवलेला असतानाही आता त्याच्यावर आणखी कठोर कारवाईची मागणी केली आहे.