Singer Dinkar Shinde Death : गायक दिनकर शिंदे काळाच्या पडद्याआड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। आनंद शिंदे यांचे धाकटे बंधू गायक दिनकर प्रल्हाद शिंदे यांचे निधन झाले आहे. प्रल्हाद शिंदे यांच्या गायनाचा वारसा पुढे नेणारा गायक आणि पुतण्या उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. (Singer Dinkar Shinde Death)


दिवगंत गायक प्रल्हाद शिंदे यांच्याविषयी जाणून घ्या …

– प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या गायकीने सर्वांना मंत्रमुग्ध केले

– कव्वाली, आंबेडकरी गीते, लोक गीते भक्ती गीतांची मबाराष्ट्राला भूरळ आहे

– प्रल्हाद शिंदे यांच्या गायकीचा वारसा आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, दिनकर शिंदे यांनी पुढे नेला

– युट्युबवर देखील त्यांच्या आवाजातील असंख्य गीते पसंतीस उतरले

– त्यांच्या गीतांच्या कॅसेट्स, सीडीज देखील बाजारात आल्या

उत्कर्ष शिंदेच्या इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हटलंय?
”(गायक-दिनकर प्रल्हाद शिंदे) महागायक प्रल्हाद शिंदेचे लहान चिरंजीव,आनंद मिलिंद शिंदेंचे( दिनू) धाकटे भाऊ आणि विजयाआनंद शिंदे चे नात्याने जरी दीर तरीही मनात स्थान मात्र पहिल्या मुलाचे. हर्षद उत्कर्ष आदर्श चे दिनू नाना.काका कमी पण दोस्त जास्त.नेहमी हसरा चेहरा,फुल ऑन एनर्जी,मस्त कलंदराच आयुष जगलेला एक मस्त कलाकार.मी नेहमी विजया आनंद शिंदे म्हणजे माझ्या मम्मीच्या तोंडून ह्या सर्वांचे लहान पनीचे किस्से ऐकले.कसे हे सर्व मंगळवेढे गावात एकाच वाडीत समोर रहाचे,एकाच शाळेत शिकायचे.लहान पण कसएकत्र गेल.कसं लहान पणीच मम्मी पप्पाच लग्न झाल.गावातून कल्याण चा प्रवास कसा झाला.गरिबी घरात होती पण ही लहान लहान मुलं किती पटापट जबाबदारीची जाण ठेवत अवेळी मोठी झाली.कसा शिंदेघराण्याचा डोलारा खांद्यावर एक एक जण घेऊ लागला.

मोठा भाऊ म्हणजेबापच आणि वहिनी म्हणजे आई .हे तुमच्या कडून शिकलो दिनू नाना. भावाभावा ने अजन्म एकत्रित कसं रहायचं ते तुमच्या कडून शिकलो.आज जेव्हा मी माझ्या पुतण्याना आल्हाद हर्षद शिंदे,अंतरा आदर्श शिंदे., आलाप हर्षद शिंदे ह्यांना खाद्यावर घेऊन मस्ती करतो तेव्हा आठवण येते तुम्हा सर्व काका लोकांची. कारण आम्हाला ही तुम्ही असेच खांद्यांवर घेऊन वाढवलत. तुम्ही ही शिकवण दिलीत पुतणे म्हणजे मित्र आपली मुलच. म्हणून आज आल्हाद मला नाना काका नाही तर मला भाई म्हणतो. शिंदेघराण्याने काय कमवल असेल तर ते असतील नाती माणसे मित्र परिवार आणि प्रेक्षकवर्ग. मागच्या वर्षी आपला सार्थक आपल्याला सोडून गेला त्याच्या जाण्याचे दुःख तुम्ही पचवू शकला नाहीत .

एका पित्याला हे दुःख पचविणे तसे अशक्यच.तरीही तुम्ही स्वतःशी ही झुंज दिलित. नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दिसलेली ऊर्जा,हास्य आम्हाला आयुषाला भिडण्याची कला शिकवून गेला..भावाभावातल प्रेम.स्टेजवर तुम्ही एंट्री केली की वेगळाच कॉन्फिडन्स हे सगळं आम्ही मिस करू. तुम्हा सर्वांना च्या संस्कारा मुळेच आज हर्षद आदर्श उत्कर्ष एकत्रित एकमेकांची ताकत बनून सोबत राहून पुढे ही असेच शिंदेघराण्याचा वट्टवृक्ष आणखीन जास्त भव्य समरुद्ध करू .तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वार्ता कळाली आणि तुमच्या सोबत घालविलेले लहानपणा पासून ते आतापर्यंतचा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला.दिनू नाना वि विल मिस यू.”

https://www.instagram.com/utkarshshindeofficial/?utm_source=ig_embed&ig_rid=8c3e6d47-cc24-4705-8e6d-90019f9c07a2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *