महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या होत्या. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन आपली चूक झाली अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. आणि अजित पवार यांनी बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. पण या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा दीड लाख मताधिक्क्यांनी पराभव झाला. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक झाली अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे. जय महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार यांनी ही कबुली दिली आहे.