महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। उद्या म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. १५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या वर्षी १५ ऑगस्ट गुरुवारी साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी १ दिवस ऑफिस आणि त्यानंतर दोन दिवस वीकेंड आले आहेत.या लाँग वीकेंडसाठी तुम्ही जर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लान कर असाल तर तुमच्यासाठी फ्लाइट तिकीट तुम्हाला खूप कमी किंमतीत मिळणार आहे. Vistara एअरलाइन्सने १५ ऑगस्टनिमित्त ही खास ऑफर दिली आहे.
Vistara च्या ऑफरमध्ये जर तुम्ही १५ ऑगस्टपर्यंत फ्लाइट तिकीट बुक केले तर तु्म्हाला सूट मिळणार आहे. तुम्ही ३१ ऑक्टोबपर्यंत बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर ही तुमच्यासाठ सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही या कालावधीमध्ये फिरायला जात असाल तर तुम्हाला फक्त १,५७८ रुपयांमध्ये फ्लाइट तिकीट मिळणार आहे. ही ऑफर इकोनॉमी, प्रिमियम इकोनॉमी आणि बिझनेस क्लासवर लागू होणर आहे. विस्तारा एअरलाइन्सच्या फेस्टिव्हल सेलमध्ये देशाअंतर्गत प्रवास करण्यासाठ इकोनॉमी क्लासमध्ये १,५७८ रुपये तिकीट असणार आहे तर प्रिमियम इकोनॉमी क्लाससाठी २६७८ रुपये आणि बिझनेस क्लाससाठी ९,९७८ रुपये तिकीट असणार आहे.
Vistara ची ही ऑफर इंटरनॅशनल फ्लाइट तिकीटवरदेखील देण्यात आली आहे. ज्यात इकोनॉमी क्लासची तिकीट ११,९७८ रुपये, प्रिमियम इकोनॉमी क्लासची तिकीट १३,९८७ रुपये तर बिझनेस क्लासची तिकीट ४६,९७ रुपयांपासून सुरु होणार आहे. Vistara फ्लाइटचा हा सेल १५ ऑगस्ट २०२४ पर्यंतच असणार आहे.