महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। देशात डेंग्यू आणि इतर आजारांनी थैमान घातलं असतानाचं आता एक खूशखबर समोर येत आहे. लवकरच डेंग्यू ( Dengue) आणि झिका (Zika) या आजारांवर लस उपलब्ध होणार आहे.
झिकावरील लसीचं उत्पादन हैदाराबादमधील ‘भारत बायोटेक’ कंपनी करत आहे, सध्या डेंग्यू आणि झिकाच्या लसीची क्लिनिकल ट्रायल सुरू असून झिका व्हायरसच्या लसीला CDSCO ची मान्यता देण्यात आली आहे. तसेच डेंग्यूवरील लसीबाबत ICMR चा हैदराबादच्या पॅनिसिया बायोटेकशी करार झाला आहे, दरम्यान डेंग्यूच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सध्या सुरू आहे. आता लस कधी होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.