महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। गणेशभक्तांसाठी मोठी बातमी आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा भूर्दंड भरावा लागू शकतो. कारण पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझरवर बंदी करण्यात आलीय, पुणे पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. विसर्जन मिरवणुकीत लेझर बिम लाईट लावल्यास मंडळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं समोर आलीय.
गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझरवर बंदी
पुण्यामध्ये गणेशोत्सव मिरवणुकीत लेझर बिम लाईट लावल्यास संबंधित गणेश मंडळांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी (Pune Ganeshotsav) दिलीय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी गणेश मंडळांसोबत आयुक्तालयात बैठक घेतली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनाचा निर्णय
बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा (Ganesh Chaturthi 2024) झालीय. ढोल ताशा पथकांच्या वादनाची वेळ निश्चित करण्यात येणार आहे. ढोल ताशा पथकातील वादकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्यासह केळकर आणि कुमठेकर रस्त्यावर वर्षानुवर्ष मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनाच परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांनी काळजी घेण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे प्रशासन यंत्रणेला सहकार्य करण्याचं आवाहन (Pune News) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलंय.
पुणे शहरात आतापासूनच गणपती उत्सवाचा आनंद आणि उत्साह दिसत (Lasers banned in Ganesh Visarjan procession in Pune) आहे. त्यासाठी गणेशमंडळांच्या तयारीला देखील वेग आलाय. याच पाश्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय. मिरवणुकीत लेझर लाईट वापरण्यावर बंदी करण्यात आलीय. पुणे पोलिसांनी याबाबतच्या सुचना दिल्यात. कायदा मोडल्यास कदाचित थेट जेलची हवा देखील खायला लागू शकते. गणेशोत्सव काळात होणारी गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीतून पुणे शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय.