महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑगस्ट ।। भारतीय निवडणूक आयोग आज दुपारी ३ वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत आयोगाकडून जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदा जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी मुख्य निवडणूक आयोग राजीव कुमार यांनी जम्मू-काश्मीर आणि हरियाणातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती.
२०१९ साली कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. तर तेथील राजकीय पक्षाकडून राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. तर केंद्र सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे की, सुरुवातीला निवडणुका होतील, त्यानंतर राज्याचा दर्जा पुन्हा मिळेल.